Tue, Jul 07, 2020 11:40होमपेज › Aurangabad › अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ

अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 24 2017 1:04AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

मार्च 2018 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावीच्या शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणार्‍या व लोककला प्रकारात सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्‍त गुण देण्यात येणार असून त्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याकरिता मुदत वाढ देण्यात आली आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणार्‍या व लोककला प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याबाबत सुधारित कार्यपद्धतीबाबत शासनाने दि. 24 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्या शासन निर्णयातील चित्रकलेच्या अतिरिक्त गुणांच्या अनुषंगाने शासन शुद्धीपत्रक काढण्यात आले असून, दहावीचे जे विद्यार्थी इंटरमिजिट ड्राईंग परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांकडे सादर होणे आवश्यक आहे.

ही बाब विचारात घेता, इंटरमिजिट ड्राईंग परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळांकडे प्रस्ताव सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर मुदतवाढ दि. 10 जानेवारी 2018 पर्यंत देण्यात आली असून या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांनी विभागीय मंडळाकडे दि. 20 जानेवारी 2018 पर्यंत पाठवायचे आहे.