होमपेज › Aurangabad › सनातन साधकांवर पोलिसांचा ‘वॉच’

सनातन साधकांवर पोलिसांचा ‘वॉच’

Published On: Aug 20 2018 1:35AM | Last Updated: Aug 20 2018 1:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबादेतील खडकेश्‍वर भागात 2001 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात तत्कालीन अधिकार्‍यांनी तपास करून सनातनच्या काही साधकांची आरोपी म्हणून नावे समोर आणली होती; पण ते मृत असल्याचे स्पष्ट झाल्यावर या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती. तेव्हापासून साधकांवर पोलिसांचा वॉच आहे. नालासोपारा शस्त्रसाठा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतील शूटर औरंगाबादचा असल्याचे समोर आल्यावर विशेष शाखेचे पोलिस साधकांवर नजर ठेवून आहेत. दरम्यान, आणखी काही संशयित रडारवर असल्याचीही चर्चा आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेत 2001 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. आरोपींना शहरात दहशत निर्माण करायची होती. दरम्यान, नांदेडमध्ये बॉम्ब बनविताना स्फोट होऊन हिमांशू पानसे मृत झाला होता. त्यानंतर औरंगाबाद स्फोटाची बंद करण्यात आलेली फाईल पुन्हा उघडण्यात आली. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त सुधीर दाभाडे, पोलिस निरीक्षक जेम्स अंबिलढगे, फौजदार गोरख चव्हाण, रामदास गाडेकर, राजेश वाघ, राजेश मोरे यांच्या पथकाने तपास करून हिमांशू पानसे (नांदेड) हा या प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न केले होते; पण तो मृत झाल्याचे समजल्यानंतर न्यायालयात तसा अहवाल पाठविण्यात आला आणि हे प्रकरण निकाली काढण्यात आले होते. तेव्हापासून साधकांच्या गुन्हेगारी कृत्याचा औरंगाबादमध्ये इतिहास आहे. त्यामुळे विशेष शाखेच्या पोलिसांचा त्यांच्या हालचालींवर वॉच आहे.