Tue, Apr 23, 2019 01:59होमपेज › Aurangabad › अरे यार थांब... म्हणेपर्यंत सचिनने मारली उडी

अरे यार थांब... म्हणेपर्यंत सचिनने मारली उडी

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 12 2018 1:21AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

एमआयटी बीएस्सी नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी सचिन सुरेश वाघ (19, रा. नवनाथनगर, हडको) याने कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन करून माहिती दिली होती. त्यावेळी मित्राने ‘भावा-भावा ऐक, मी सर्वकाही ठीक करून देतो, तुझे विषय बॅकमध्ये ठेवणार नाहीत, असे आश्‍वासन देत असे काही करू नको, अशी विनंती केली’, परंतु सचिनने त्याचे ऐकले नाही. 

त्यानेकेवळ आई-वडिलांना समजावून सांग, असे म्हणत फोन कट केला आणि इमारतीवरून उडी मारली. यातच सचिनचा मृत्यू झाला. दोन मित्रांमधील संवादाचा हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

उडी मारण्यापूर्वीचा ऑडिओ व्हायरल :  आई-वडिलांना समजावून सांगण्याची केली विनंती

सचिनचा मित्रासोबतचा संवाद असा

सचिन : ‘हां, भाऊ कुठे आहे?

मित्र : घरी आहे, बोलना

सचिन : अरे, भावा ऐकना

मित्र :     हां, बोलना

सचिन : अरे, कॉलेजमध्ये पेपर चालू आहेतना. आज माझी चिठ्ठी पकडली

मित्र : चिठ्ठी पकडली का?

सचिन : हो, तर मला सहा महिने बॅक राहायला लावत आहेत.

मित्र : अरे यार, थांब मी काही तरी करतो.

सचिन : अरे, भावा ऐक-ऐक, मी आता येथे चौथ्या फ्लोअरवरून कुदी मारतोय

मित्र : अवाक् होऊन, काय-काय?

सचिन : मी चौथ्या फ्लोअरवरून कुदी मारतोय, तू फक्‍त माझ्या घरच्यांना सांग.

मित्र : ए, अरे असे काही करू नको बरं का? थांब-थांब, मी काही तरी करतो.

सचिन : सॉरी भावा, पाहा बरं का?

मित्र : ये सचिन, असे नको करू बरं का? ऐक-ऐक

सचिन : भाऊ सॉरी यार..!

मित्र : हॅलो सचिन, हॅलो सचिन, अरे मी करतो सर्व ठीक. थांब दोन मिनिटे, असे काही करू नको.

सचिन : (रडत-रडत बोलला) हॅलो, हॅलो, माझ्या घरच्यांना सांग

मित्र : हॅलो, हॅलो करीत असतानाच त्याने उडी मारली

Tags : Aurangabad, sachin, jumped, 4th, floor