होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : तरुणीची छेड काढल्याप्रकरणी शिक्षकाला काळे फासले

औरंगाबाद : तरुणीची छेड काढल्याप्रकरणी शिक्षकाला काळे फासले

Published On: Mar 12 2018 1:59PM | Last Updated: Mar 12 2018 1:59PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

येथील बारावीत शिकणाऱ्या तरुणीची छेड काढत असल्याचा आरोप करीत तरुणांनी शिक्षकाला काळे फसल्याची घटना आज सकाळी घडली. शहरातील स. भू. महाविद्यालयात ही घटना घडली. पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेतले असून तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

मनोज जैस्वाल असे शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणातील तरुणी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत बारीवीच्या वर्गात शिकत आहे.  शिक्षक जैस्वाल हे  मागील अनेक दिवसांपासून तरुणीला व्हिडिओ कॉल करून त्या तरुणीला अश्लील मेसेज टाकत होता. ही बाब तरुणीच्या भावाला माहिती झाल्यानंतर आठ ते दहा तरुणांसह महाविद्यालयामध्ये असणार्‍या शिक्षकाला काळे फासण्यात आले.या घटनेनतंर पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. तरुणीच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.