होमपेज › Aurangabad › धावत्या कारने घेतला पेट

धावत्या कारने घेतला पेट

Published On: Apr 13 2018 1:38AM | Last Updated: Apr 13 2018 1:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचे वेळीच लक्षात आल्याने तीन माध्यम प्रतिनिधी सुदैवाने बचावले आहेत. ही घटना गुरुवारी सव्वादोन वाजेच्या सुमारास नगर रस्त्यावरील ओव्हरब्रिजवरघडली आहे.
याबाबत अग्निशमनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अवसरमल व त्यांचे दोन सहकारी हे गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास कार क्र. एमएच 20 बीएन 4984 ने वाळूजकडून औरंगाबादकडे येत होते. लष्कर कार्यालयाजवळ मातामंदिराजवळील ओव्हरब्रिजवर कारमधून धूर निघत असल्याचे एका वाहनचालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी कारचालकास सांगितले.

कारमधील अवसरमल यांच्यासह तिघे गाडी थांबवून बाहेर निघताच तिने पेट घेतला. त्यामुळे तिघेही बालंबाल बचावले. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. मात्र कारला आग लागल्याचे दिसताच पुलाजवळ ड्यूटीवर असलेल्या लष्करी जवानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन विभागाचे डी. डी. साळुंके, अब्दुल रशीद, संग्राम मोरे, राम सोनवणे, शेख आमिर, शेख तनवीर व शेख समीर यांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत कार पूर्णपणे जळून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.याबाबत छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यातआली आहे.

Tags : Aurangabad, running, car, fire