होमपेज › Aurangabad › कुरण येथे सशस्र दरोडा; चोरट्यांच्या मारहाणीत एक गंभीर

कुरण येथे दरोडा; चोरट्यांच्या मारहाणीत एक गंभीर

Published On: Sep 08 2018 9:58AM | Last Updated: Sep 08 2018 10:21AMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

अंबड तालुक्यातील कुरण येथे तीन ठिकाणी सशस्र  दरोडा पडल्याची घटना दि ७ सप्टेंबर च्या मध्यरात्री घडली. यात एक जण जखमी झाला असून त्याला औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुरण येथे नवीन वस्तीवर सुंदर जिजा सोलनकर घराच्या बाहेर झोपले असताना चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना एका खोलीत कोंडले. तसेच घरात झोपलेला त्यांचा मुलगा श्याम याच्या खोलीची कडी तोडून सात ते आठ चोरांनी घुसून मारहाण केली. चोरट्यांनी सोने, चांदी व रोख रक्कम चोरून नेली. तर गावाच्या खालच्या बाजूला असलेल्या अशोक भगवान काळे व सुरेश सोनसळे यांच्या घरातील दोन ठिकाणी जाऊन सोने चांदी व रोख रक्कम सहित लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी गावातील कांबळे यांना दगड मारला आहे.

या दरोड्यात किती ऐवज आणि रक्कम लंपास केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही अशी माहिती गोंदीचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी दिली. रात्री पासून चोरांच्या तपासासाठी घनसावंगी, अंबड व गोंदी पोलिसांचे पथक तपास करत आहे. डॉग स्कॉड व फिंगर प्रिंट यांना घटनेची माहिती कळविण्यात