होमपेज › Aurangabad › बीड विधानपरिषद: मतमोजणीचे हायकोर्टाचे आदेश

बीड विधानपरिषद: मतमोजणीचे हायकोर्टाचे आदेश

Published On: Jun 11 2018 2:03PM | Last Updated: Jun 11 2018 2:03PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची अपात्र ९ नगरसेवकांसह मतमोजणी करून तात्काळ निकाल जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी दिले.  

न्यायमूर्तींनी बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या नगरसेवकांना मतदान करण्यास परवानगी दिली होती. त्यांचे मत मोजावे; परंतु त्यांच्या मतांचा परिणाम निवडणुकीवर होत असेल, तर निकाल जाहीर करण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाच्या उन्हाळी सुटीतील न्यायमूर्तींनी दिलेल्या अंतरिम निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. 

बीड नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह ९ अपात्र घोषित नगरसेवकांच्या वतीने दाखल केलेली याचिका आणि निवडणुकीतील उमेदवार अशोक हरिदास जगदाळे यांच्या वतीने दाखल केलेल्या दुसºया याचिकेच्या अनुषंगाने अ‍ॅड. सतीश बी. तळेकर आणि अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी, तर गणेश वाघमारे यांच्या वतीने दाखल याचिकेच्या अनुषंगाने अ‍ॅड. नितीन गवारे यांनी युक्तिवाद केला, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. अलोक शर्मा यांनी काम पहिले