Sun, Feb 17, 2019 13:09होमपेज › Aurangabad › जणू नातेवाईकच घाटीचे नोकर

जणू नातेवाईकच घाटीचे नोकर

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 1:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठवाड्यासह पंधरा जिल्ह्यांतील गरीब रुग्णांचे आधारवड असलेल्या घाटीत अनेक असुविधांचा सामना रुग्णांसह नातेवाइकांना करावा लागतो. या रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णाला तत्काळ आत घेण्याची सुविधा नाही. बाह्यरुग्ण विभागाच्या गेटवर स्टे्रचरसह कर्मचारी तैनात ठेवणे घाटी प्रशासनाचे काम असताना, तेथे स्ट्रेचरच काय कर्मचारीही जागेवर सापडत नाहीत. यामुळे अनेक रुग्ण ताटकळून पडलेले असतात. नातेवाइकांनाच स्टे्रचर शोधून आणून रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे दै. पुढारीच्या पाहणीत दिसून आले.

घाटीत रुग्णांची हेळसांड होत असल्यामागे रुग्णसंख्या जास्त व कर्मचारी संख्या कमी असल्याची कारणे प्रशासनातर्फे दिली जातात. मात्र, जे कर्मचारी उपस्थित आहेत, तेही तत्परतेने सेवा देत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होते. गोंधळलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना घाटीत व्यवस्थितरीत्या मार्गदर्शनही मिळत नाही. शुक्रवारी सिंदखेड राजाचा एक रुग्ण मृत झाल्यानंतर नातेवाइकांना मृतदेह वाहून नेण्यासाठी जवळपास दीड तास स्ट्रेचर उपलब्ध होऊ शकले नाही. यानंतर त्यांनी स्टे्रचर शोधून आणले तर, तर तेथील कर्मचार्‍यांनी त्यांना कोणतीही मदत न करता तुम्हीच ओढून न्या असे सांगितले. भर उन्हात रुग्णांना नातेवाईक स्ट्रेचरवरून ओढून नेत असल्याचे चित्र हे नित्याचे झाले आहे.

Tags : Auranganbad,  relatives,  waiter