Sun, Jan 20, 2019 21:09होमपेज › Aurangabad › धूलिवंदनाचे रंगही बहरले

धूलिवंदनाचे रंगही बहरले

Published On: Mar 02 2018 1:22AM | Last Updated: Mar 01 2018 11:11PMबीड : प्रतिनिधी

जिल्हाभरात गुरुवारी होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावोगाव होळी पेटविण्यात येऊन पूजा करण्यात आली. शुक्रवारी धूलिवंदन असल्याने गुरुवारी अनेक शाळांमध्ये रंगोत्सव साजरा करण्यात आला. धूलिवंदनाचा रंग तरुणाईवर अधिकच चढला होता. शहरात दुपारनंतरच अनेकजण रंगात रंगल्याचे दिसून आले. तर दुुपारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्टेडिअम परिसरात एकत्र येत जातीअंताची होळी पेटविली.

बीड शहरासह जिल्हाभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेकांनी वाईट विचार, व्यसन, जातीवाद याला मूठमाती देत होळी साजरी केली. शाळा-महाविद्यालयांमध्ये शुक्रवारी सुटी असल्याने गुरुवारीच धूलिवंदाचा आनंद लुटण्यात आला. ग्रामीण भागामध्ये घरोघरी होळी तर साजरी केलीच शिवाय मंदिरांसमोर होळी पेटविण्यात आली. यावेळी लहानथोरांनी होळीची पूजा करून बोंबही ठोकली.