होमपेज › Aurangabad › रयत क्रांती संघटनेने जाळला खा. राजू शेट्टी यांचा पुतळा

रयत क्रांती संघटनेने जाळला खा. राजू शेट्टी यांचा पुतळा

Published On: Feb 25 2018 1:34AM | Last Updated: Feb 25 2018 1:25AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

राज्याचे कृषी, पणन व स्वच्छतामंत्री तथा सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर शनिवारी (दि.24) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माढा मतदारसंघात हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद औरंगाबादेत उमटले असून सदाभाऊंनी स्थापन केलेेल्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खा. शेट्टी यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्‍त केला.

सदाभाऊ खोत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी टीव्ही सेंटर चौकात दुपारी 4 वाजेदरम्यान रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी खा. राजू शेट्टी यांच्याविरोधात तीव्र निषेध व्यक्‍त केला. यानंतर शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

जिल्हाध्यक्ष विनायक भानुसे पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांना आवर घाला, अन्यथा शेट्टी यांना मराठवाड्यात पाय ठेवू देणार नाही. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयांना बांगड्यांचा आहेर भेट देण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. आंदोलनात सतीश शिंदे, श्री सरोदे, श्री लोखंडे, विनायक तांगडे, सतीश साळुंखे, राम भानुसे, अमजद शेख, प्रभुनाना शेजूळ, समाधान फुले, अनिल शेळके आदी उपस्थित होते.