होमपेज › Aurangabad › मराठवाड्यात एक महिन्याने पावसाची हजेरी

मराठवाड्यात एक महिन्याने पावसाची हजेरी

Published On: Aug 16 2018 11:35AM | Last Updated: Aug 16 2018 11:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पंचवीस दिवसांनंतर मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली, बुधवारपासुन रिमझिम व जोरदार सरी बरसत आहेत, आज सकाळ पासून रिपरिप सुरुच आहे. मागील 24 तासात मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी 2.5 टक्क्यांनी वाढली आहे. नांदेड, उस्मानाबादमध्येही अतिवृष्टी झाली.

मराठावाड्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात समाधानकारक पाऊस पडला. मात्र त्यानंतर थेट कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मागील 24 तासात झालेला सरासरी पाऊस

औरंगाबाद (4.61), जालना (11.80), परभणी (24.68)हिंगोली (37.13), नांदेड (31.26), बीड (21.62), लातूर (25 49), उस्मानाबाद (47.58) इतका पाऊस पडला असून सरासरी 25.32 मिलीमिटर पाऊस मराठवाड्यात झाला.

यंदा 16 ऑगस्ट पर्यंत 331.54 मिलीमिटर पावासची नोंद झाली असून अपेक्षित वार्षिक पाऊस 779 मिलीमिटर इतका होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.