होमपेज › Aurangabad › सातारा-देवळाईकरांचा ‘आक्रोश’ मोर्चा 

सातारा-देवळाईकरांचा ‘आक्रोश’ मोर्चा 

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 1:26AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘विकास करा, विकास करा’, ‘सातारा-देवळाईचा विकास करा’ मनपा प्रशासन हाय हाय... आदी घोषणा देत सातारा-देवळाई संघर्ष समितीतर्फे गुरुवारी (दि.15) महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे संतप्त झालेल्या नागरिकांच्या आक्रोशापुढे महापौरांना सर्वसाधारण सभा 

तहकूब करून नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांना सामोरे जावे लागले.  यावेळी महापौरांना घेराव घालून पंधरा दिवसांत विकासकामांना प्रारंभ करा, अन्यथा आम्ही रास्ता रोको करू असा इशाराही नागरिकांनी दिला.    

निवेदनात म्हटले आहे की, सातारा-देवळाई परिसराचा महानगरपालिकेत समावेश होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही या भागात मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. रस्ते, पाणी, ड्रेनेजलाइन, पथदिवे या सुविधा मिळाव्यात यासाठी  वारंवार पाठपुरावा करूनही मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे. जलवाहिनी व ड्रेनेजलाइन टाकण्यात यावी, सर्व रस्ते सिमेंंट काँक्रिटचे करण्यात यावेत, रस्त्यांवर पथदिवे लावण्यात यावेत,  वॉर्डातून जमा झालेला कर याच भागाच्या विकासासाठी वापरण्यात यावा, आदी मागण्या आंदोलकांनी यावेेळी केल्या.

आंदोलनात रमेश बहुले, सोमिनाथ शिराणे, पद्मसिंह राजपूत, असद पटेल, आबासाहेब देशमुख, राहुल शिरसाट, रामेश्‍वर पेंढारे, रणजित ढेपे, दिनेश चौहान, संजय कुलकर्णी, दिलीप पाळादे, विनोद सोनर, अमर पटेल, नीलेश चाबुकस्वार, बद्रीनाथ थोरात, प्रदीप मोहिते, विलास सनान्से, छोटू पटेल, रोहन पवार, गुलाब पवार, प्रा. प्रशांत अवसरमल, मुद्रका धोपटे, संध्या पाटोळे, शीलाबाई जाधव, कलावती भालेराव, सुमन पाटील, माधुरी देशमुख, आदींची उपस्थिती होती.