Tue, Jul 16, 2019 22:35होमपेज › Aurangabad › पडेगावात कचर्‍याच्या गाड्या अडविल्या

पडेगावात कचर्‍याच्या गाड्या अडविल्या

Published On: Jul 18 2018 12:30PM | Last Updated: Jul 18 2018 12:30PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पडेगाव येथे शहरातील कचरा टाकण्यास आज सकाळपासूनच विरोध सुरू झाला आहे. मनपाने काल पोलिस बंदोबस्तात येथे पन्नास ट्रक कचरा टाकला. त्यानंतर आज सकाळी पुन्हा कचर्‍याच्या पंधरा गाड्या तिथे पोहचल्या. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या देत या गाड्या अडविल्या आहेत. 

मनपाकडून दोन दिवसांपासून शहरातील कचरा पडेगाव परिसरात नेऊन टाकला जात आहे. त्यास स्थानिक नागरिकांनी मंगळवारी कचर्‍याच्या गाड्यांवर दगडफेक करुन विरोध दर्शविला होता. मात्र, नंतर मनपाने पोलिस बंदोबस्तात दिवसभरात सुमारे पन्नास ट्रक कचरा तिथे टाकला. आज मनपाच्या कचर्‍याच्या गाड्या पुन्हा पडेगाव परिसरात पोहचल्या. त्याविरोधात नागरिक आक्रामक झाले असून, त्यांनी सकाळपासूनच कचर्‍याच्या गाड्या अडविल्या आहेत. सध्या पडेगाव येथे परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या देऊन बसले आहेत. दुसरीकडे मनपाचे वरिष्ठ अधिकारीही तिथे पोहचले असून ते नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.