Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Aurangabad › ३२ टक्के मुलांना येत नाही भागाकार

३२ टक्के मुलांना येत नाही भागाकार

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 08 2018 12:42AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे 32 टक्के मुलांना साधा भागाकार येत नाही तर 57 टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. याला सर्वस्वी जबाबदार हा शिक्षक आहे व शिक्षकांना या गोष्टी येत नाही याला जबाबदार हे अधिकारी आहेत, असे वक्तव्य शालेय शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी  केले.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत औरंगाबाद जिल्हा शाळा भेटी व अध्ययन स्तर निश्‍चिती या विषयावर चर्चेचे आयोजन विद्या प्राधिकरणाच्या कार्यालयात करण्यात होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, शाम मकरणपुरे, जि.प. प्राथ. शिक्षणाधिकारी अश्‍विनी लाठकर, माध्य. शिक्षणाधिकारी गजानन सुसर, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, सुभाष कांबळे यांची उपस्थिती होती.

नंदकुमार पुढे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजांप्रमाणे शिक्षणही आवश्यक गरज आहे. मुलांना घडवण्यासाठी शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य असते. विद्यार्थ्यांना दृष्टी देण्याचे काम शिक्षकाचे आहे, मात्र शिक्षकांनाच डोळे आहे, मात्र दृष्टी नाही तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार असेही ते म्हणाले.

१२९८ शाळा होणार बंदच...

राज्यातील पटसंख्या कमी असणार्‍या शाळा बंद करण्यात येणार असून त्यात 1298 शाळांचा समावेश आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार आम्हाला आहे. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांचे दुसर्‍या शाळांमध्ये समायोजन करण्यात येईल तसेच त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था तसेच इतर सर्व सुविधा शासन पुरवेल, असे नंदकुमार यांनी सांगितले.