Mon, Jul 13, 2020 10:26होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : गरोदर माताने केली कोरोनावर मात

औरंगाबाद : गरोदर माताने केली कोरोनावर मात

Last Updated: May 23 2020 7:41AM

गरोदर मातेला रुग्णालयातून डिस्चार्र्ज देण्यात आला.औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधीत गरोदर महिलेने कोरोनावर मात केली आहे. अवघ्या बाराव्या दिवशी तिचा दुसरा स्वॅब नमुना निगेटिव्ह आल्याने चिंता मिटली आहे. मात्र, सदर गरोदर महिलेची प्रसुती कालावधी पुर्ण न झाल्यामुळे तिच्या जीवाला धोका होता. मात्र, घाटीतील डॉक्टरांनी योग्य पद्धतीने मानसिक आधार देऊन उपचार केल्यामुळे तिने कोरोनावर मात केली. शुक्रवारी (दि.२२) तिला घरी सोडण्यात आले. जुना मोढा, भवानीनगर येथील ही महिला आहे.

वाचा :औरंगाबादेत आता 'डेडिकेटेड कोविड मॅटर्निटी'

जुना मोंढा, भवानीनगर येथील हॉट्स्पॉटमधून एका २७ वर्षीय गरोदर मातेला त्रास सुरु झाल्याने १० मे रोजी घाटीत दाखल करण्यात आले. तिच्या स्वॅब नमुना घेऊन तपासला गेला. त्यात ती कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर कोव्हिड वॉर्डात उपचार सुरू होते. स्त्रीरोग व प्रसुती विभागाच्या डॉक्टरांनी तिच्यावर विशेष उपचार केले. तिच्या पहिला बाळ हे सिझरद्वारे जन्माला आले होते. त्यात आताची प्रसुती कालावधी अद्याप पुर्ण झालेला नव्हता. त्यामुळे ती हाय रिस्कमध्ये होती. सलग १२ दिवस उपचार पुर्ण केल्यानंतर तिची पुर्नतपासणी करण्यात आली. त्यात अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. तिला शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

वाचा :औरंगाबाद : मृत्यूचे सत्र सुरूच! २ महिलांचा मृत्यू