Tue, Apr 23, 2019 18:06होमपेज › Aurangabad › अवैद्यरित्या वाळु तस्करी ; १५ लाखाचा मुद्येमाल जप्त

अवैद्यरित्या वाळु तस्करी ; १५ लाखाचा मुद्येमाल जप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पैठण : प्रतिनिधी

शहरात बैलगाडीच्या सहाय्याने गोदावरी पात्रातून अवैद्यरित्या वाळु वाहतुक करणा-या  २६ मालकांना पैठण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  ३० गाड्या आणि ६० बैल जप्त यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी मालकांना समज देऊन सोडून दिले. बैलगाडी मालकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवार सकाळी पोलिस निरिक्षक चंदन इमले यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने कारवाई केली. 

गेल्या सहा महिन्यांपासून गोदापात्रात मौलाना साहब दर्गा ,पाटेगांव पुल, नाथ समाधी मंदिर परिसरातून शेकडो बैलगाड्यांमधून बेकायदेशिररित्या वाळूची चोरी करण्यात येत आहे. मात्र या चोरट्या वाहतुकीकडे महसुल विभाग आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत होते. गुरूवारी पहाटे पोलिस पथकाने नाथसमाधी मंदिर परिसर व पाटेगाव पुल परिसरात वाळू वाहतूक करणा-या ३० बैलगाड्या, ६० बैल ,३० मालकांवर गुन्हे  दाखल करण्यात आले असून चार मालक फरार झाले आहे. एकुण १५ लाख ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पैठण तालुक्यात एकाही वाळू पट्ट्याचा लिलाव झाला नसतानाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात ट्रक, बैलगाडी, ट्रँक्टरच्या सहायाने वाळू उपसा सुरू आहे. आज पोलिसांनी या बैलगाड्यांमधून होणाऱ्या वाळू वाहतुकी विरोधात कारवाई केल्याने वाळू तस्करात खळबळ उडाली आहे. 

एक वर्षापुर्वी शहर व परिसरात पाच ते सहा बैलगाड्यांनी अवैद्यवाळू उपसा होत असे, मात्र महसुल व पोलिस प्रशासनाच्या भितीने धनदांडग्या वाळू तस्करांनी आपला मोर्चा बैलगाडीकडे वळवल्याने परिसरातील गोदावरी पात्रातील ६ ठिकाणाहून बैलगाडीने वाळू उपसा सुरू आहे. जवळपास दोनशे  बैलगाड्याने वाळू उपस्याचा धंदा सुरू आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक भास्कर सोनवणे,  सुदाम वारे पो. काँ. सिराज पठाण, किशोर गवळी, बाळासाहेब कंचार, किशोर शिदे, शेख राजु, आदी सहभागी होते.

Tags : aurangabad, police,  illeagal ,  buisensess


  •