Thu, Jun 04, 2020 03:13होमपेज › Aurangabad › मतदानाचा व्हिडिओ 'टिकटॉक' वर टाकणे पडले महागात, तरूणावर गुन्हा दाखल  

मतदानाचा व्हिडिओ 'टिकटॉक' वर टाकणे पडले महागात, तरूणावर गुन्हा दाखल  

Published On: Apr 23 2019 5:59PM | Last Updated: Apr 23 2019 5:59PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

मतदान करतानाचा सेल्फी काढणे किंवा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकण्याचे फॅड यंदा चांगलेच वाढले आहे. औरंगाबादमध्ये असे कृत्य करणे एका तरुण मतदाराला चांगलेच महागात पडले. नायब तहसीलदारांनी त्या तरुणाविरुद्ध थेट सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पोलिस उपायुक्तांनी सांगितले की,एका अज्ञात इसमाने मतदान बुथच्या आतमध्ये मतदान करत असतांनाचे व्हिडिओ तयार करून Tik-Tok या अँप वर टाकले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिध्द झाल्याची अधिकृत तक्रार प्राप्त झाल्याने औरंगाबाद शहर येथील सायबर पोलिस स्टेशन येथे भादवि, लोकप्रतिनिधींत्व अधिनियम, माहिती तंत्रज्ञान कायद्या प्रमाणे नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.