Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Aurangabad › बॉम्बस्फोट : संशयित आरोपीला औरंगाबादमध्ये अटक

बॉम्बस्फोट: संशयित आरोपीला औरंगाबादेत अटक

Published On: Aug 08 2018 2:15PM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी एका संशयित आरोपीला  दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) औरंगाबादमधून ताब्यात घेतले. मुंबई आणि गुजरातच्या एटीएस पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संशयित आरोपी शहरात येणार असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली. तो सिग्मा हॉस्पिटलमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला असता त्याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. यावेळी त्याचे नाव यायाह अब्दुल रहमान शेख असे नोंदवण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.