Thu, Apr 25, 2019 13:43होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : एटीएसने निराला बाजारातून एकास उचलले

औरंगाबाद : एटीएसने निराला बाजारातून एकास उचलले

Published On: Aug 15 2018 1:58AM | Last Updated: Aug 15 2018 1:58AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नालासोपारा प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मध्यरात्रीनंतर येथील निराला बाजार भागातून एकाला उचलले. त्याला तत्काळ मुंबईला नेण्यात आले असून त्याचे नाव समजू शकले नाही. 

ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा मोठा कट एटीएसने दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री नालासोपारा येथे छापा मारून उघडकीस आणला. सनातन संस्थेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 20 देशी बॉम्ब जप्‍त करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादेतही मंगळवारी रात्री निराला बाजार भागातून एकास उचलण्यात आले.