Sat, Feb 16, 2019 14:52होमपेज › Aurangabad › सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; अधिकाऱ्याचे निलंबन

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; अधिकाऱ्याचे निलंबन

Published On: Feb 15 2018 1:53PM | Last Updated: Feb 15 2018 2:05PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट करणारे महापालिकेचे सहाय्यक नगररचनाकार जयंत खरवडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिले. महापालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेंद्र जंजाळ व राज वानखेडे यांनी खरवडकर यांच्या संदर्भात  प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी ‘नालायक लोकांना सभागृह मिळाल्यानंतर बेछुट आरोप केले जातात’ अशा आशयाची पोस्ट केली होती. 

यावर प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बुधवारी  त्यांनी आपण ही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्यातील वादासंदर्भात होती, असा खुलासा केला केला होता. मात्र त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. सभेत नगरसेवकांनी केलेल्या मागणीनूसार निलंबनाच्या कारवाईचे आदेश महापौरांनी दिले.