Fri, Nov 16, 2018 00:17होमपेज › Aurangabad › मेंदी लावली म्हणून परिचारिकेला सुटी

मेंदी लावली म्हणून परिचारिकेला सुटी

Published On: Jan 18 2018 1:59AM | Last Updated: Jan 18 2018 1:49AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

रुग्णसेवा देताना परिचारिकांसाठी काही आचारसंहिता आहेत. या आचारसंहितेचे पालन केले नाही म्हणून शासकीय कर्करोग रुग्णालयात मेट्रनने बुधवारी (दि. 17) एका परिचारिकेला सुटी दिली. यावर चांगलाच वाद झाला. मुख्य कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी गुरुवारी (दि.18) याबाबत बैठक बोलाविली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी एका परिचारिकेने हातावर मेहंदी लावल्याचे पाहून मेट्रनने तिला जाब विचारला. परिचारिकांसाठी रुग्णालयात कर्तव्यावर असताना काही आचारसंहितेचे पालन करावे लागते. यात हाताला मेंदी लावणे, आभूषणे आदी वापरता येत नसल्याचे कारण सांगून कर्करोग रुग्णालयातील मेट्रनने सदर परिचारिकेला सरळ घरी जाण्यास सांगितले. यावर सेवा शर्तीचा मुद्दा समोर आला. मुख्य कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्यापर्यंत हा वाद गेल्यानंतर त्यांनी रुग्णसेवा देताना पाळाव्या लागणार्‍या आचासंहितेवर गुरुवारी सकाळी 10 : 30 वाजेदरम्यान बैठक बोलाविली आहे. यात याविषयी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.