Thu, Jul 18, 2019 12:50होमपेज › Aurangabad › जळकी बाजार येथे उभारले छत्रपती शिवरायांचे मंदिर  

जळकी बाजार येथे उभारले छत्रपती शिवरायांचे मंदिर  

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMसिल्लोड : अमोल नाईक

तालुक्यातील जळकी बाजार येथील अनेक शिवप्रेेमींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचेे मंदिर उभारून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हे पहिलेच मंदिर आहे. या मंदिरात सहा फूट उंचीची छत्रपती राजेंची मूर्ती असून शिवप्रेमी त्याची दररोज सकाळी व सायंकाळी नित्यनेमाने आरती व पूजाअर्चा करून आपली श्रद्धा व्यक्‍त करतात. आज (दि. 19 फेब्रुवारी) शिवजयंती असून त्यानिमित्त या गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक  कार्यक्रमांसह साहस क्रीडा, विविध स्पर्धा, पोवाडे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने मोठ्या संख्येेने शिवपे्रमी हजेरी लावतात.  

महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील किल्ले सैनिकांच्या मदतीने आपल्या कर्तबगारीने ताब्यात घेऊन निर्माण केलेल्या दरारामुुळे महाराष्ट्रात जन्मलेल्या शिवरायांचे नाव सबंध जगात अभिमानाने घेतले जाते.  
शिवजयंती सोहळा म्हटले की, शिवप्रेमींच्या अंगात एक प्रकारे उत्साह येतो. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संबंध महाराष्ट्रासह कानाकोपर्‍यातील राज्यात मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात शिवप्रेमी साजरी करतात. यानिमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक  कार्यक्रमांसह साहस क्रीडा, विविध स्पर्धा, पोवाडे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल-ताशा व लेझीमच्या गजरात काढली जाते. यात शिवप्रेमी अगदी पूर्णपणे नाहून जातात. मिरवणुका, देखावे, शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमतो. उत्तररात्रीपर्यंत शिवरायांची मिरवणूक चालते.    

शिवजयंती साजरी करण्याच्या दृष्टीने गेेल्या वर्षी सिल्‍लोड तालुक्यातील जळकीबाजार येथील शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांची सहा फूट उंचीची मूर्ती आणली होती. मिरवणूक झाल्यानंतर ही मूर्ती ठेवयाची कुठे असा प्रश्‍न निर्माण झाला. ही मूर्ती गावात कुणाच्या घरात ठेवण्यापेक्षा आपण मंदिर बांधून तिची प्रतिष्ठापना करू, असा निर्णय सर्व शिवप्रेमींनी घेतला. त्यानंतर गावातून लोकवर्गणी करून मंदिराचे बांधकाम सुरू केले. काही महिन्यांत या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवप्रेमी या मूर्तीची दररोज सकाळी व सायंकाळी नित्यनेमाने आरती व पूजा अर्चा करून आपली श्रद्धा व्यक्‍त करतात. शिवजयंतीनिमित्ताने आज येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.