Tue, Apr 23, 2019 14:03होमपेज › Aurangabad › हल्लाबोल मोर्चासाठी क्रांतीचौकात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते 

हल्लाबोल मोर्चासाठी क्रांतीचौकात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते 

Published On: Feb 03 2018 1:28PM | Last Updated: Feb 03 2018 1:28PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल मोर्चासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते क्रांतीचौकात दाखल झाली आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या बड्यानेत्यासह हल्लाबोल रॅलीला प्रारंभ होणार आहे. या मोर्चात युवक-युवतीचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. 

तर या मोर्चात युवक विविध वेशभूषेत सहभागी होत आहेत. आणि युवकाकडून जोरदार सरकारविरोधी घोषणा देण्यात येत आहेत. तसेच पारंपारिक लोकसंगीत व शेतकरी आत्महत्याचा जीवंत देखावा मोर्चात लावण्यात आला आहे.