Thu, Mar 21, 2019 00:55होमपेज › Aurangabad › सिल्लोड येथे विक्रीसाठी जाणारा गुटखा पकडला

सिल्लोड येथे विक्रीसाठी जाणारा गुटखा पकडला

Published On: Jan 11 2019 7:22PM | Last Updated: Jan 11 2019 7:22PM
सिल्लोड : प्रतिनिधी

सिल्लोड येथे अवैधरित्या विक्रीसाठी जाणारा गुटखा उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांनी पकडला. दोन रिक्षा एक स्कूटी व विविध कंपनीचे गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू असा एकूण ५ लाख ६७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी पाच जनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.  

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे अब्दुल खालेद युनुस देशमुख (रिक्षा चालक) वय ४४ वर्ष रा. स्नेह नगर सिल्लोड, शेख नदीम अकील वय १६ वर्ष रा. जामा मस्जिद जवळ सिल्लोड तर फरार झालेल्या आरोपींमध्ये शेख एजाज, शेख आसेफ, मिर्झा शकिल बेग (रिक्षा चालक) तिन्ही रा. सिल्लोड असे आहे.

अधिक माहिती अशी की उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांना गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली की, सिल्लोड शहरातील गुलशन नगर येथील एका घरातून मोठ्या प्रमाणात गुटखा रिक्षामध्ये भरून विक्रीसाठी जात आहे. मिळालेल्या माहिती नुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांनी त्यांच्या पथकासह वरील ठिकाणी छापा मारला असता, तेथे त्यांना एक स्कूटी क्र एम एच २० इ एस  ०३३४  व दोन ऑटो रिक्षा क्र एम एच २० क्यू ५४७० व एम एच २० डब्लू  ४६८२ मध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू भरलेला आढळून आला. त्‍यामुळे एकूण ५ लाख ६७ हजार १५० रुपयांचा मुद्देमालासहित दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर यातील तीन आरोपी फरार झाले. याप्रकरणी बी आर शेळके पो ना नेमणूक पोलिस ठाणे सिल्लोड, शहर संलग्न उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, अन्न व भेसळ सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधव यांच्या फिर्यादी वरुण शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.