Thu, Nov 15, 2018 14:30होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षणाच्या मुद्यावरच ‘एनडीए’सोबत : राणे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरच ‘एनडीए’सोबत : राणे

Published On: Feb 11 2018 6:33PM | Last Updated: Feb 11 2018 6:33PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठ्यांना आरक्षण देण्याची भाजप सरकारची मानसिकता आहे. मुंबईतील मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनीही आपल्याला याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. त्यांच्या याच गोष्ठीवर विश्‍वास ठेवून आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादेत पक्षाच्या जाहीर सभेसाठी आले असता राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण मराठ्यांना आरक्षण दिले होते. पण न्यायालयात प्रकरण गेले. सरकारनेही शपथपत्रात राणे समितीने केलेल्या सर्वेनुसार किती मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल, याची माहिती दिली नाही. परिणामी आरक्षणाला स्थगिती मिळाली. मात्र, भाजप सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे आणि याच मुद्यावर आपण त्यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी नमूद केले.