Thu, Nov 15, 2018 11:57होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये गर्भवती महिलेची 'हत्या'?

औरंगाबादमध्ये गर्भवती महिलेची 'हत्या'?

Published On: Feb 12 2018 1:41PM | Last Updated: Feb 12 2018 1:41PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

हळदीचा कार्यक्रम सुरू असताना लागलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पैठणगेट येथील महिलेलाच जीव गमवावा लागला. मंजुषा अजय कदम असे मृत ३१ वर्षीय महिलेचे नाव आहे. दुर्दैवी बाब म्‍हणजे संबंधित महिला ही गर्भवती होती. त्यामुळे एका बरोबर दोघांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे. तसेच या प्रकरणी हत्येचा संशयही व्यक्‍त होत आहे.

याप्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्‍ह्याची नोंद झाली असून उपनिरीक्षक संजय बनकर अधिक तपास करीत आहेत.