होमपेज › Aurangabad › औरंगाबाद: अज्ञातांच्या हल्‍ल्‍यात एक ठार, एक गंभीर

औरंगाबाद: अज्ञातांच्या हल्‍ल्‍यात एक ठार, एक गंभीर

Published On: Mar 13 2018 12:09PM | Last Updated: Mar 13 2018 12:09PMपाचोड : प्रतिनिधी

अज्ञात चोरट्यांच्या हल्‍ल्यात एक ठार तर एक गंभीर असल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवार दि.१२ मार्च रोजी राञी १० वाजता घडली. पैठण तालुक्यातील आडूळ शिवारात ही घटना घडली आहे.

सिध्दलिंग रामलिंग कोर हे एमआयटी शाळेजवळून चालक सुनील प्रभाकर सुरडकर (रा. जाधववाडी औरंगाबाद) हे कार (एमएच १२ एचएम ३२५६) ने परळीवरून औरंगाबादकडे जात होते. यावेळी आडूळ शिवारात कार आली असता कारवर अज्ञातांनी दगडफेक केली. दगडफेक कुणी केली हे पाहण्यासाठी सुनील सुरडकर उतरले असता अज्ञातांनी त्‍यांच्यावर धाराधार शस्‍त्राने हल्‍ला केला. यामध्ये एकाचा मृत्‍यू झाला असून रोखड, दागिने काढून घेण्यात आले आहेत. पाचोड पोलिस स्‍थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक महेश अंधाळे याचा तपास करीत आहेत.  

औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, पैठण उपविभागीय पोलिस अधीक्षक स्वप्निल राठोड घटनास्‍थळी दाखल होऊन तपास सुरू आहे.