Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Aurangabad › प्रियकराच्या मदतीने पतीचा खून 

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून 

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 08 2018 12:45AM

बुकमार्क करा
पिशोर : प्रतिनिधी 

अनैतिक संबधास अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने दोरीने गळा आवळून पत्नीने पतीचा निर्घृन खून केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. ही खळबळजनक घटना पोलिस तपासअंती उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणी मृताच्या पत्नीसह अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने 10 जानेवारीपयर्र्ंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
देवमन विठ्ठल सोनवणे (45, रा. निंभोरा,  ता. कन्नड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर मृताची पत्नी मीराबाई, पंडित कायंदे (रा. वासडी ता. कन्नड), गणेश शिंदे (रा.जांभई, ता. सिल्लोड, ह. मु. गुलमोहर, कॉलनी, औरंगाबाद) असे आरोपींची नावे आहेत. 

   पोलिसांच्या माहितीनुसार देवमन यांची पत्नी मीराबाई हिच्याशी गावातील पंडित कायंदे  याच्याशी अनैतिक संबध होेते, मात्र त्या दोघांच्या या संबधास देवमन हा अडसर ठरत होता. त्यामुळे देवमनचा काटा काढण्याचा निर्णय मीराबाईसह व पंडित याने घेतला. 24 डिसेंबरच्या रात्री 11.30 वाजेच्या सुमारास देवमन हा झोपीत असताना मीराबाई, पंडित व सहकारी गणेश यांनी संगनमत करून देवमनचा दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर  देवमनचा मृतदेह पोत्यात टाकून त्याला दुचाकीव्दारे एकघर पाडळी शिवारात आणण्यात आले. 25 डिसेंबर रोजीच्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने देवमनचा मृतदेह सुभाष तुळशीराम साबळे यांच्या शेतातील मक्याच्या गंजीत टाकून त्याला पेटवून दिले. तेथून आरोपींनी धूम ठोकली. दरम्यान, याच दिवशी सकाळी देवमनचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला. यामुळे त्याची ओळख पटणे कठीण झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक  सुभाष भुजंग यांनी आपल्य पथकासह  घटनास्थळी भेट दिली. पंचनाम्या दरम्यान मृताजवळ विविध वस्त्ाू आढळून आल्या. तसेच  25 डिसेंबर पासून देवमन बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार 3 जानेवरी रोजी मीराबाई हिने पिशोर पोलिस ठाण्यात नोंदविली होती. यावरून पोलिसांनी घटनेच्या तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, याप्रकरणी प्रथम शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा खून मी  एकट्याने केला नसून त्यात पंडित व मीराबाईचा सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर मीराबाईसह पंडित याला अटक केली. अनैतिक संबधास अडसर ठरत असल्याने मीराबाईच्या मदतीने आम्ही देवमनचा खून केल्याची कबुली शिंदे व पंडित यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्यांना 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
यांनी केले तपासकार्य 

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्वला बनकर, उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सचिन कापुरे, विलास हजारे, गणेश मुळे, विठ्ठल देशमुख, पो.ना. नदीम शेख, पो.कॉ.बाबासाहेब नवले, जीवन घोलप, योगेश तरमाळ, पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे, उपनिरीक्षक जयराज भटकर, संजय देवरे, सुनील ढेरे, किसन गवळी, देवकर यांनी परिश्रम घेतले.