औरंगाबाद : प्रतिनिधी
घरात बसलेल्या व्यक्तीला फोन करून बोलावून घेत चाकूने भोसकून निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. 10) दुपारी 4 वाजेच्या सुमारास रोहिला गल्लीत घडली. विशेष म्हणजे, सिटी चौक पोलिस ठाण्याच्या पाठीमागे हाकेच्या अंतरावरच झालेल्या या घटनेची माहिती तब्बल दोन तासांनंतर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी धावले. तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाले. एका रिक्षाचालकाने मयताला घाटीत दाखल केले.
सय्यद अखिल हुसेन सय्यद हमीद (वय 45, रा. नूर कॉलनी,टाऊन हॉल) असे मयताचे नाव आहे. ते पूर्वी चष्म्याच्या दुकानात कामाला होते. तेथील काम सोडल्यापासून ते हकीम म्हणून कामकरीत होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सय्यद अखिल हे रविवारी दुपारी स्वतःच्या घरात होते. ओळख असलेल्या खमर बेगम (रा. रोहिला गल्ली, सिटीचौक) हिचा त्यांना फोन आला. तिने बोलावल्यामुळे सय्यद अखिल हे भाच्याला घेऊन तिच्या घरी गेले. त्यांना तेथे सोडून भाचा निघून गेला. त्यानंतर काही वेळाने खमर बेगम यांनी शेख इस्माईल यांना फोन करून सय्यदअखिल यांना माझा भाऊ शेख शफिक व शेख अतिक यांनी मारहाण केल्याने ते बेशुद्ध झाले असल्याचे सांगितले. हे कळताच इस्माईल यांनी नातेवाइकांना सांगून रोहिला गल्ली गाठली. तेथे सय्यदअखिल हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. इस्माईलने त्यांना लगेचच घाटीत हलविले; परंतु तोपर्यंत रक्तस्त्राव खूप झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृतदेह दोन तास अपघात विभागात
सय्यद अखिल यांचा खून झाल्याचे कळताच नातेवाईक चक्रावून गेले. कारण;काही तासांपूर्वी ते घरी होते. त्यानंतर भाच्याने त्यांना खमर बेगम हिच्या घराकडे सोडले आणि आता थेट त्यांच्या खुनाची बातमी आली, याचा अनेकांना धक्का बसला. विशेष म्हणजे, पोलिसांना माहिती न देताच सय्यद अखिल यांचा मृतदेह घाटीत आणला होता. घाटी चौकीतील पोलिस हवालदार अरुण टेकाळेव तडवी यांनी त्यांना ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नातेवाईकांनी सिटीचौक ठाण्यात जाऊन माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक राजेंद्रबांगर घाटीत आले.खमर बेगमचा घाटीतून काढता पायखमर बेगम हिच्या घरातच सय्यदअखिल यांचा खून झाला. त्यानंतरही ती सय्यद अखिल यांना घेऊन घाटीत आली होती; परंतु नंतर सय्यद अखिल यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती समजली. ते हळूहळू घाटीत जमा होऊ लागले. वातावरण आपल्याविरुद्ध जाईल, या भीतीने खमर बेगम हिने तेथून काढता पायघेतला.
ठसे तज्ज्ञांनी घेतले नमुने
खुनाची माहिती मिळाल्यावर पोलिसांसह ठसे तज्ज्ञघटनास्थळी धावले. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून विविध नमुनेघेतले आहेत. तसेच, सिटी चौकठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर-दराडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून हवालदार इलग हे तपास करीत आहेत.