Thu, Mar 21, 2019 09:00होमपेज › Aurangabad › मुंडवाडीत महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

मुंडवाडीत महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

Published On: Jan 10 2019 9:20PM | Last Updated: Jan 10 2019 9:20PM
कन्नड  : प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील मुंडवाड़ी गावातील शिवारात एका चाळीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील मुंडवाड़ी येथील आरोपी गणेश रामहारी शिंदे याने ११ डिसेंबर रोजी शेतातून काम उरकून घरी जात असलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केला. तसेच याबाबत कोणास सांगितल्यास तुझ्या मुलास व पतीस जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. घडल्याप्रकारामुळे ती महिला प्रचंड प्रमाणात घाबरली होती. याबाबत पिडीत महिलेने १० जानेवारी रोजी फिर्याद दिली. फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपी विरुध्द कलम ३५४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.