Tue, Jul 16, 2019 22:34होमपेज › Aurangabad › मयूरपार्कमध्ये तरुणीची आत्महत्या

मयूरपार्कमध्ये तरुणीची आत्महत्या

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 08 2018 12:44AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

अज्ञात कारणावरून एका तरुणीने मयूरपार्क परिसरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दुर्गा अशोक अग्रवाल (वय 18 रा. घृष्णेश्‍वर कॉलनी, मयूरपार्क) असे आत्महत्या करणार्‍या तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा अग्रवाल हिने रविवारी राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला. हा प्रकार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तिच्या घरातील लोकांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांना माहिती देऊन दुर्गाला शेजार्‍यांच्या मदतीने वडील अशोक अग्रवाल यांनी घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दुर्गाने आत्महत्या का केली, हे मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.