Thu, Jul 18, 2019 21:13होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : मुलाला आरक्षण द्या म्‍हणत केली आत्‍महत्‍या

औरंगाबाद : मुलाला आरक्षण द्या म्‍हणत केली आत्‍महत्‍या

Published On: Aug 10 2018 10:50AM | Last Updated: Aug 10 2018 10:50AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

येथील विजयनगर येथील दादाराव शेळके यांनी आरक्षण आणि कर्जबाजारीपणामुळे आत्‍महत्या केली असल्‍याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. शेळके यांनी आत्‍महत्‍या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी "माझी आत्महत्या करण्याचे कारण, कोणाचाही त्रास नव्हता, पण मी मराठा समाजाचा असल्याने मला सरकारचे कोणतेही फायदे मिळले नाही. मी श्रीराम फायनान्समधून दोन लाख रुपये कर्ज काढले होते. फायनान्सवाले जास्त परेशान करीत होते. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. त्याला दुसरे कोणी जबाबदार नाहीत. मी घरच्या लोकांचा उदरनिर्वाह पुरवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व, माझ्या मुलांना आरक्षण देण्यात यावे, ही विनंती, अशी आत्‍महत्‍या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

शेळके वाळॅज भागातील एका कंपनीत कामाला होते अशी माहिती पोलिसांनी दिली.