Tue, Mar 19, 2019 20:29होमपेज › Aurangabad › मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या, अन्नत्याग आंदोलन तूर्तास मागे

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या, अन्नत्याग आंदोलन तूर्तास मागे

Published On: Aug 16 2018 10:48AM | Last Updated: Aug 16 2018 10:48AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने १९ जुलै पासून सुरू झालेले ठिय्या आंदोलन व १५ ऑगस्ट पासून पुकारण्यात येणारे एकवेळ अन्नत्याग आंदोलन  तूर्तास मागे घेत आसल्याचा निर्णय  १५ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत झाल्याचा दावा डॉ. शिवानंद भानुसे यांनी बुधवारी(दि.१५) आयोजित पत्रकार परिषदेत केला. 

‌भानुसे म्हणाले की, क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्च्या तर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रथमच राज्यभर कडकडीत बंद पाळण्यात आला.  मुख्यमंत्र्याच्या चिथावणीखोर विधानाने मराठा समाजच्या ३२ युवकांनी आत्मबलिदान दिले.या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या हत्याच आहेत.त्यांच्या कुटुंबियांना आद्याप सरकार कडून काहीच मदत मिळालेली नाही. ती लवकर मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

‘आंदोलनादरम्यान सरकारने काही घोषणा केल्या. त्याप्रमाणे  आंदोलकांवरील  गुन्हे  सरसकट मागे घ्यावेत. आण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी उपलब्ध करून द्यावा. वसतिगृसाठी प्रत्येक जिल्ह्यात २० गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी. मराठा विद्यार्थ्याची सरसकट 50 टक्के फी माफ करावी या व सर्व मागण्यांची 15 ते 20 दिवसात अंमलबजाणी करावी.त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात विनोद पाटील यांच्या याचिकेसंदर्भात मुंबई हायकोर्टने 10 सप्टेंबर पर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाचा प्रगती अहवाल देण्याचे व 15 नोव्हेंबर पर्यंत अंतिम अहवाल द्यावा असे निर्देश दिले आहेत.परंतू सरकार विशेष आधिवेषण केव्हा बोलावणार हें जाहीर केलेले नाही.सरकारने या संदर्भात त्वरित कालमर्यादा जाहीर करावी. या सर्व मागण्या संदर्भात सरकाने त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा १५ ते २० दिवसात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे समन्वयकांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले.