Mon, Jul 22, 2019 14:01होमपेज › Aurangabad › ...अन्‌ अंत्यसंस्‍कारावेळीच मृताला फुटला घाम

...अन्‌ अंत्यसंस्‍कारावेळीच मृताला फुटला घाम

Published On: Apr 06 2018 4:56PM | Last Updated: Apr 06 2018 4:56PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

थंडी तापाने फणफणलेल्या रिक्षाचालकावर आठ दिवसांपासून घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. अखेर शुक्रवारी (दि. ६) सकाळी ६ वाजता घाटीतील डॉक्टरांनी प्रकृती अत्यवस्थामुळे रुग्णाला मृत घोषित केले. मात्र, नैसर्गिक मृत्यू असल्याने शवविच्छेदन न करता रुग्णाला घरी नेण्यात आले. नातेवाईकांना निरोप देऊन कुटुंबियांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली.

तिरडी बनविणे, आंघोळीसाठी पाणी गरम करणे, रडारडी सुरू असताना मृताला चक्‍क घाम फुटला. अनेकदा कपाळावरील घाम पुसल्यानंतरही परत-परत घाम येत असल्याने मृताच्या पुतणीला शंका आली. तिने मृताला पाणी पाजले तर चक्‍क त्याने पाणीही पिले. हा कुठला चमत्कार नसून हर्सूलमधील राधास्वामी कॉलनीत घडलेली सत्य घटना आहे. या प्रकारानंतर नातेवाईकांनी तत्काळ रुग्णाला घाटीत भरती करून डॉक्टरला जाब विचारला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा हा कळस मानला जात आहे. आप्पासाहेब दाभाडे (४५, रा. राधास्वामी कॉलनी, हर्सूल) असे रुग्णाचे नाव असून सध्या त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.