Sat, Nov 17, 2018 10:03



होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : वैजापुरात प्रेमीयुगुलाची आत्महत्या 

औरंगाबाद : वैजापुरात प्रेमीयुगुलाची आत्महत्या 

Published On: Jul 03 2018 12:33PM | Last Updated: Jul 03 2018 12:34PM



 वैजापूर : प्रतिनिधी

वैजापूर शहरालगत असलेल्‍या साधारण पाच किलोमीटर अंतरावरील रोठीवस्‍ती परिसरात आज, ३ जुलै रोजी, सकाळी ९ वाजण्‍या सुमारास  प्रेमीयुगुलाने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना  घडली आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनी जीवनयात्रा संपविल्याचे समजते.

सागर राहूल म्हैसमाळे,  (वय  २५ ) व साक्षी बाबासाहेब शेजवळ, ( वय  १८ ) दोघेही जांबरगाव ता. वैजापूर असे आत्महत्या केलेल्या युगुलाचे नाव आहे.  साक्षी ही वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात  बारावीत शिक्षण घेत होती तर सागर हा व्यवसाय करीत होता. याबाबत पोलिसांनी  मिळालेल्‍या माहितीनुसार  वैजापूर शहरानजीक असलेल्या लाडगाव रस्त्यावरील रोठीवस्तीजवळील नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पोटचारीलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला हे  प्रेमीयुगुल लटकलेल्‍या अवस्‍थेत आढळले. 

त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले.  याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.