होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : लिंगायत महामोर्चाने शहर दणाणले

औरंगाबाद : लिंगायत महामोर्चाने शहर दणाणले

Published On: Apr 08 2018 4:37PM | Last Updated: Apr 08 2018 4:37PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी हजारो लिंगायत बांधव रविवारी दि. ८ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले. स्वयंमशिस्त व महिलांचा लक्षनीय सहभाग ही मोर्च्याची वैशिष्ट्य होती. 

क्रांतिचौकात सकाळी ९ वाजता मराठवाडयतील सर्वच जिह्यामधून मोर्चेकरी जमा व्हायला सुरुवात झाली. दुपारी महामोर्च्याने आगेकूच केली. मोर्च्यात सर्वात समोर महिला होत्या. हळूहळू मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, जिल्हाधिकारी  कार्यालय मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहचला. शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. 

रस्त्याने कोणालाही त्रास होऊ नये  म्हणून स्वयंसेवकांची फळी कार्यरत होती. जागोजागी मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एक लिंगायत कोटी लिंगायत, महात्मा बसवेश्वर की जय, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. 


पोलिसांचा तगडा बंदोबस्त 

लिंगायत समाज बांधवांचा मोर्चा मोठ्या संख्येने निघणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनास होती. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. क्रांतीचौक ते पैठणगेट वरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती.


मान्यवरांची उपस्थिती

या महामोरच्याला डॉ. शिवलिंग शिवाचार्य व जगतगुरु माने महादेवी यांची उपस्थिती होती. तसेच मोठ्यासंख्येने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.