Thu, Jul 18, 2019 02:13होमपेज › Aurangabad › भीतीपोटी रात्रभर झोप येत नाही हो साहेब...

भीतीपोटी रात्रभर झोप येत नाही हो साहेब...

Published On: Feb 22 2018 11:23AM | Last Updated: Feb 22 2018 4:31PMलासूर स्टेशन : संदीप गायकवाड

साहेब रात्र रात्रभर झोप येत नाही हो ... मागील तीनचार महिन्यांत लासुरात चोरी, दरोडा, खून अशा  घटना घडत आहेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांना घेऊन रात्ररात्र भीतीपोटी जागं राहावं लागतं. कधी कोण कुठून येईल का, काही करेल का याच भीतीपोटी रात्रभर झोप येत नाही हो साहेब...अशी कैफियत येथील व्यापारी कैलास जाजू व सहकार्‍यांनी मंगळवारी  रास्ता रोको दरम्यान पोलिस अधिकार्‍यांसमोर मांडली. 

वाचा : सर्व कर्मचारी साखरपुड्याला; बसस्थानक ६ तास रामभरोसे!

कैलास जाजू यांच्या वडिलांचा 14 नोव्हेंबर 2017 रोजी 90 तोळे सोने लुटून, डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. त्या घटनेला आज 100 दिवस पूर्ण झाले  असून त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. तर या घटनेच्या दोन महिने अगोदरच येथील व्यापारी महावीर पाटणी यांच्या मातोश्री राजुलबाई पाटणी यांचाही सोने चांदी लुटून, 25  सप्टेंबर 2017 रोजी खून करण्यात आला होता. त्या घटनेचा  ही अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्याच बरोबर 20 फेब्रुवारी 2018 रोजी मध्यरात्री विनोद जाजू व त्यांच्या पत्नी सुषमा जाजू यांच्यावर प्राणघातक  हल्‍ला करून लाखोंचा ऐवज लुटून नेला. या घटनांमुळे लासूरवासी भयभीत झाले आहेत. दरम्यान मंगळवारी जाजू दांपत्यावर झालेल्या प्राणघातक  हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या विरोधात लासूरकर रस्त्यावर आले.

वाचा : पैसे संपल्याने मृतदेह चार तास रूग्णालयासमोर

रास्ता  रोको आंदोलन केले. याप्रसंगी प्रभारी पोलिस अधीक्षक उज्वला वनकर यांच्याशी चर्चा  करताना व्यापारी कैलास जाजू आणि सहकार्‍यांनी  आपली कैफियत मांडली. जाजू यांनी सांगितले की, चोरी आमच्या घरात झाली. खून आमच्या घरात झाला. तरी पण चौकशी  आमचीच करतात हा कसला न्याय? न्याय करता येत नसेल तर गोळ्या घाला आम्हाला... असे  भावूक उदगार देखील यावेळी काढले. दुकानाचे शटर तोडणे, तर कुठे दुकात चोरी करणे, कुठे घरातील सोन्या- चांदीचा ऐवज लुटून गळा दाबून खून करणे, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे अशा विविध घटना घडत आहे.  चोरीचा प्रयत्न झालेले ठिकाणे : बस स्थानक रिसरात उमेश मोर,  लासूरगाव रोडवरील संगेकर इलेक्ट्रिकल, पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणारी सोमाणी मोबाईल शॉपी, प्रेमचंद लोढा यांच्याकडे चोरीचे प्रयत्न झाले आहेत.

वाचा : 'अभ्यासाचा ताण आलाय, मला माफ करा'

यातील महावीर नगरातील दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.  तर जिल्हा परिषद शाळेजवळील किशोर कोठारी यांचे किराणा दुकान, महापुरे ब्रदर्स, लासूरगाव रोड वरील महेश भावसार, कोठारी बंधू यांच्याकडे चोरी झाली. महावीर पाटणी यांच्या मातोश्री व कैलास जाजू  यांचे वडील यांचा चोरट्यांनी खून केला.