Thu, Jul 18, 2019 02:48होमपेज › Aurangabad › अद्रकीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

अद्रकीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Published On: Mar 13 2018 4:36PM | Last Updated: Mar 14 2018 12:53AMअंधारी : दीपक सिरसाठ

सिल्लोड तालुक्यातील अंधारीसह लोणवाडी मांडगाव दिडगाव उपळी म्हसला टाकळी मोहरा आदी परिसरातील शेतकर्‍यांच्या  डोळ्यात पाणी  आणले आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हाताला अद्रक पीक लागले; परंतु, ऐन काढणीला आलेल्या अद्रकाला एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. अजून शेतकर्‍यांचे नव्वद टक्के अद्रक बाजारात यायचे आहेत. मात्र, योग्‍य दर मिळत नसल्‍याने शेतऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहेत. 

सततची संकटे शेतकर्‍याचा हात सोडत नसल्याने येणार्‍या काळात अजून किती संकटे आहेत, या विवंचनाने शेतकरी हवालदिल झाला आहे. परीसरातील शेतकरी कपाशी मक्का या पिकांबरोबरच अद्रक या पिकाचीही मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. जुन आणि जुलै महीन्यात दमदार पडलेल्या पावसावर अद्रक पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्‍यानंतर पाऊसही चांगला पडल्याने अद्रक चांगली बहरली होती. परंतु, आता शेतातील विहिरीने तळ गाठल्‍याने पाण्याअभावी शेतकऱ्यांना नाईलाजास्तव अद्रक काढावी लागत आहे. त्यात बाजारात अद्रकला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने अद्रकची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. शेतीत दिवसेंदिवस वाढता खर्च आणि उत्पन्न यात मोठी तफावत त्यात पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी पुरताच भरडला जात आहेत. सद्या अंधारी परीसरात खाजगी व्यापाऱ्यांकडून अद्रकीला भाव एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये याप्रमाणे मिळत आहे. परंतु, लागवड तसेच महागडी खते औषधी व मजूरीचा खर्च पाहता शेतकऱ्यांना हा दर परवडणारा नसल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांना एक एकर अद्रक लागवडीसाठी कोंबडी खत एक ट्रक, विस हजारांचे शेणखत, रासायनिक खत पंधरा हजार, शिवाय लागवड ते काढणी पर्यंतचा पंचवीस हजारांचा खर्च, अद्रक बेने पंचवीस हजार, असा एकुन एकरी एक लाख बारा हजारांचा खर्च आल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर कोलते यांनी सांगितले.

त्यापासून सत्तर क्विंटल उत्पन्न मिळाले परंतु, भाव योग्य नसल्याने उत्पन्न आणी खर्च यात मोठी तफावत असल्याने शेतकरी आज डबघाईत आला आहे.  शेतमाल निघण्याची वेळ आणी त्यात शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकऱ्यांचे चांगले दिवस कधी येईल असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.