Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षणाचा दुसरा बळी, विष घेतलेल्‍या एकाचा मृत्‍यू 

मराठा आरक्षणाचा दुसरा बळी, विष घेतलेल्‍या एकाचा मृत्‍यू 

Published On: Jul 25 2018 10:28AM | Last Updated: Jul 25 2018 10:28AMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजातील आणखी एकाने आत्महत्या केली आहे. काल (दि. २४ जुलै) विष घेतलेल्या जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (55) यांचा आज उपचारादरम्‍यान मृत्यू झाला. त्‍यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत दोघांनी बलिदान दिले आहे. 

वाचा बंद LIVE : ठाण्यात मराठा समाजाच्या वतीने रास्‍तो रोको 

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला राज्यभर हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात कायगाव टोका येथे 23 जुलै रोजी एकाने जलसमाधी घेतली. त्यानंतर कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात एकाने नदीत उडी घेतली होती तर, दुसऱ्याने विष प्राशन केले होते. विष घेतलेल्या जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (55,) यांचा मृत्यू झाल्याचे घाटातील सूत्रांनी सांगितले.