Wed, Jan 16, 2019 04:46होमपेज › Aurangabad › ‘स्पा’मधील तरुणी मायदेशी परतणार; दूतावासाचे आले पत्र

औरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’मधील तरुणी मायदेशी परतणार

Published On: Dec 24 2017 11:49AM | Last Updated: Dec 24 2017 11:52AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रोझोन मॉलमधील दोन ‘स्पा’ सेंटरमध्ये आढळून  आलेल्या थायलंडच्या नऊ तरुणींना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया 26 डिसेंबरपर्यंत करावी, असे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने  यांनी दिले. थायलंड  दूतावासाच्या अधिकार्‍यांनी त्यांची तिकिटे काढण्यात येत असल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यानंतर त्या तरुणींचा दुभाषीमार्फत न्यायालयात उशिरापर्यंत जबाब नोंदविण्यात  आला. 

पोलिस उपायुक्‍त दीपाली घाडगे यांच्या विशेष पथकाने  7 डिसेंबरला प्रोझोन मॉलमधील दोन ‘स्पा’ सेंटरमध्ये सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस आणला होता. या पथकाने 9 थाई तरुणी, 2  स्थानिक तरुणी, 4 ग्राहक आणि तीन  कर्मचारी अशा 18 जणांना अटक केली होती. नऊ थाई तरुणींची न्यायालयाने सावित्रीबाई महिला सुधारगृहामध्ये, तर अन्य 9 जणांची हर्सूल कारागृहात रवानगी  केली. 

थायलंडच्या 9 तरुणींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.  एस. वमने यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, दोन दुभाषींनी या थाई तरुणींशी संवाद साधून, न्यायालयात जबाब नोंदविला. त्या वेळी या तरुणींनी मायदेशी जाण्याची इच्छा केल्यामुळे न्यायालयाने तपासाचा आढावा घेतला  असता सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला. हा  हवाल  पाहून न्यायालयाने समाधान व्यक्‍त केले.

दूतावासाचे पत्र

थायलंडच्या दूतावासाने  न्यायालयात पत्र सादर केले. ते पत्र नंतर पोलिसांकडे देण्यात आले. त्या नऊ थाई तरुणींना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया 26 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश दिले. तरुणींना मायदेशी पाठवेपर्यंत पोलिसांनी  त्या तरुणींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आदेशित केले. दरम्यान, दूतावासाने त्या तरुणींना मायदेशी पाठविण्यासाठी त्याच्या  तिकिटांची प्रक्रिया सुरू केली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या तरुणींचा जबाब न्यायालयामध्ये  नोंदविण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात पाठविण्यात आले