Wed, May 22, 2019 10:20होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय देहव्यापाराचा पर्दाफाश (व्हिडिओ)

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय देहव्यापाराचा पर्दाफाश

Published On: Dec 07 2017 11:53PM | Last Updated: Dec 08 2017 12:12AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मराठवाड्यातील नामांकित प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा’ आणि ‘दी स्ट्रेस हब’ या दोन फॅमिली स्पामध्ये चक्‍क हेअर कटिंग आणि मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या आंतरराष्ट्रीय ‘उद्योगा’चा औरंगाबाद पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. येथे चक्‍क विदेशी तरुणींना आणून त्यांच्याकडून देहविक्री करण्यात येत होती. थायलंडच्या नऊ विदेशी तरुणींसह दोन स्थानिक तरुणी, स्पाचे चार व्यवस्थापक आणि शहरातील चार व्हीआयपी ग्राहक, अशा तब्बल 19 जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. 

या कारवाईबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे- घाडगे यांनी सांगितले की, प्रोझोन मॉलमध्ये दुसर्‍या मजल्यावर तीन वर्षांपूर्वी ‘अनंतरा द फॅमिली स्पा’ आणि ‘दी स्ट्रेस हब’ या नावाने दोन फॅमिली स्पा सेंटर सुरू झालेले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही स्पा एकाच मालकाचे आणि जवळ-जवळ आहेत. या ठिकाणी हेअर कटिंग सलून आणि थाई मसाजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे यांनी या अड्ड्याचा पर्दाफाश करण्याची योजना आखली. 

पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी खात्री करण्यासाठी दोन पंटरांना तेथे पाठविले. खात्री पटल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ‘त्या’ पंटरांना पुन्हा तेथे पाठविले. त्याआधीच उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे, सहायक आयुक्‍त अनिता जमादार, महिला तक्रार निवारण कक्षाच्या पोलिस निरीक्षक किरण पाटील, सिडको एमआयडीसीचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, फौजदार दीपक बिरारी हे स्पाच्या बाजूला दबा धरून बसले. 

50 हजारांपर्यंत दर
ठरल्याप्रमाणे पंटरांनी ग्राहक बनून हे दोन्ही स्पा गाठले. बोलत बोलत तेथील कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेतल्यानंतर महिलांची मागणी केली. त्यावर पाच हजारांपासून 50 हजार रुपये दराच्या विविध वयाच्या मुली पुरविण्याची तयारी दोन्ही स्पाच्या व्यवस्थापकांनी दर्शविली. पैसे देताच व्यवस्थापकांनी त्यांना दोन थायलंडच्या मुली दिल्या.

खोल्यांसह सर्व सुविधा
देहविक्रीचा ‘उद्योग’ करण्यासाठी या दोन्ही स्पामध्ये संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली होती. येथे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी चार-चार आलिशान खोल्या बनविण्यात आलेल्या होत्या. या खोल्यांमध्ये मुलींना घेऊन पंटर गेले. त्यानंतर इशारा मिळताच बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने तेथे छापा मारला. तेथून 19 जणांना पोलिसांनी अटक केली.