Thu, Jul 18, 2019 04:04होमपेज › Aurangabad › सकलेश्‍वरचा शिलालेख तब्बल 783 वर्षांपूर्वीचा

सकलेश्‍वरचा शिलालेख तब्बल 783 वर्षांपूर्वीचा

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 18 2018 1:40AMऔरंगाबाद : गजेंद्र बिराजदार

अंबाजोगाईच्या बाभूळबन परिसरातील बाराखांबी अर्थात सकलेश्‍वर मंदिर परिसरात सापडलेला शिलालेख 783 वर्षांपूर्वीचा असल्याचे समोर आले आहे. हा शिलालेख संस्कृत भाषेतील असून त्यावर शके 1156 जयसंवत्सर असा उल्लेख आहे, असे शिलालेख तज्ज्ञ अभिजित दांडेकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. 

बाराखांबी मंदिर परिसराची स्वच्छता करताना जमिनीत गाडले गेलेले प्राचीन हेमाडपंती मंदिराचे अवशेष तसेच अनेक मूर्ती असा ठेवा आढळला होता. यात या शिलालेखाचाही समावेश आहे. अवजड यंत्राने जमीन उकरल्यामुळे अनेक मूर्ती आणि अवशेषांची नासधूस झाली असून शिलालेखाचे दोन तुकडे झाले आहेत. त्यातील एका भागाचे छायाचित्र दांडेकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याचे वाचन केले. ते म्हणाले पूर्ण शिलालेखाचे छायाचित्र मिळाल्यानंतर त्यावर नेमके काय लिहिले आहे हे समजून येईल. तथापि, शिलालेखाचा जेव्हढा भाग अवलोकनास मिळाला त्यावरून हा देवनागरी लिपीत लिहिलेला संस्कृत भाषेतील शिलालेख असल्याचे स्पष्ट होते. या शिलालेखावर शके 1156 असा उल्लेख आहे. त्यामुळे तो इ.स. 1234 मध्ये कोरला गेला असल्याचे दिसते.