औरंगाबाद जिल्ह्यात ४७ रुग्णांची वाढ

Last Updated: Jun 03 2020 9:05AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


औंरगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ४७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६९६ झाली आहे. आज पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळीची संख्या ८५ झाली आहे. आतापर्यंत १०८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, ५२६ रुग्ण उपचार घेत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 55 नवे रुग्ण आढळले 

रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : 

जसवंतपुरा (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (२), अजिंक्य नगर (१), समता नगर (२), समृद्धी नगर, एन-४ सिडको (१), जय भवानी नगर (१), लेबर कॉलनी (२), मिल कॉर्नर (४), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (१), भावसिंपुरा (२), शिवशंकर कॉलनी (५), पिसादेवी रोड (१), कटकट गेट (१), सिल्लेखाना नूतन कॉलनी (१), बारी कॉलनी (१), उल्का नगरी (१), एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (१), शरीफ कॉलनी (१), कैलास नगर (४), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (१), विद्यानिकेतन कॉलनी (१), सुराणा नगर (२), अन्य (३) आणि यशवंत नगर, पैठण (३), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू 

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-४ ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या ७४ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी ६.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६८, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १६, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ८५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.