Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Aurangabad › आता चौथ्या मंत्र्यांची पोलखोल करणार : हर्षवर्धन जाधव

आता चौथ्या मंत्र्यांची पोलखोल करणार : हर्षवर्धन जाधव

Published On: Jan 18 2018 10:42AM | Last Updated: Jan 18 2018 12:50PM

बुकमार्क करा
सोयगाव : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा मंत्री बबनराव  लोणीकर यांच्यासह तीन मंत्र्यांची मी पोलखोल केली असून, आता चौथ्या मंत्र्यांचा नंबर आहे, असा दावा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. भाजपत प्रवेश करीत नसल्याने माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी दिला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

सोयगाव ते चाळीसगाव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याचे पाहून सोयगाव तालुक्यातील पत्रकारांनीच या रस्त्यासाठी उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सोयगाव तालुका पत्रकार चाळीसगाव ते सोयगाव रस्त्याच्या नूतनीकरणासाठी बेमुदत उपोषण करणार आहेत. यासाठी आ. जाधव पत्रकारांच्या उपोषणाचे निवेदन स्वीकारण्यासाठी सोयगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोयगावच्या रस्त्यांसाठी बांधकाममंत्री पाटील निधी देत नाहीत. या उलट भाजप आ. प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी 12 कोटींचा निधी दिला. मी शिवसेनेचा आमदार असल्याने भाजप निधीसाठी मुस्कटदाबी करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.