Sun, Feb 17, 2019 05:03होमपेज › Aurangabad › भांडकुदळ बायको नको रे बाबा! पत्नी पीडितांची वटपौर्णिमा

भांडकुदळ बायको नको रे बाबा! पत्नी पीडितांची वटपौर्णिमा

Published On: Jun 27 2018 8:10AM | Last Updated: Jun 27 2018 8:10AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

एकीकडे ‘सात जन्म हाच पती मिळावा म्हणून बुधवारी सुवासिनी वडाला फेर्‍या मारून वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याच्या तयारीत मग्न आहेत. तर दुसरीकडे ‘सात जन्मच काय, सात सेकंदासाठीही भांडकुदळ पत्नी नको’ असे म्हणत वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वाळूज महानगरात पत्नी पीडितांनी पिंपळाच्या झाडाला फेरे मारून आगळीवेगळी पूजा केली.

औरंगाबादेतील ही पत्नी पीडित संघटना गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी पीडितांसाठी कार्य करते. या संघटनेने पत्नी पीडितांसाठी मुंबई हायवेवर एक आश्रमही सुरू केलेला आहे. पत्नीमुळे त्रस्त असलेले, पत्नीने छळाचा गुन्हा नोंदविल्याने त्रस्त झालेले अनेक पुरुष या संघटनेत सक्रिय आहेत. पुरुषांच्या न्याय-हक्‍कासाठी या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक आगळीवेगळी आंदोलनेही करण्यात आलेली आहेत. मंगळवारी या संघटनेने असेच अनोखे आंदोलन केले. या संघटनेचे कार्यकर्ते सिडको वाळूज महानगरातील पिंपळाच्या (मुंजा) झाडाजवळ गोळा झाले. या पत्नी पीडितांनी मग पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारत ‘भांडकुदळ बायकांच्या त्रासातून आम्हाला मुक्‍त कर, सात जन्म काय; पण सात सेकंद देखील भांडकुदळ बायको नको’ असे म्हणत मनोभावे पूजा करून पुरुषांची पत्नीच्या त्रासातून मुक्‍तता कर, असे
पिंपळाला साकडे घातले.

यावेळी भारत फुलारे, प्रमोद तरवटे, विशाल नांदरकर, चरणसिंग गुसिंगे, अरुण ठोंबरे, शिवराज कांबळे, नितीन गारजकर, पांडुरंग गांडुळे, संजय जाधव, शेख कादीर, मनोज परदेशी, कौतिक जोगांडे, रामेश्‍वर नवले, मल्‍लेय कुर्‍हा आदी उपस्थित होते.