Wed, Feb 20, 2019 16:48होमपेज › Aurangabad › पतीवर हल्ला करून पत्नी ‘त्याच्या‘सोबत ‘सैराट’

पतीवर हल्ला करून पत्नी ‘त्याच्या‘सोबत ‘सैराट’

Published On: Jun 20 2018 10:51AM | Last Updated: Jun 20 2018 10:51AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पती बाहेर असताना घरात प्रियकरासोबत गप्पा मारणार्‍या पत्नीला पतीने रंगेहाथ पकडले. आता आपले बिंग फुटणार, याची भीती वाटल्याने पत्नीने पतीवर चाकूहल्ला केला आणि प्रियकरासोबत  दुचाकीवरून धूम ठोकली. ही घटना चिकलठाण्यात 17 जून रोजी रात्री 8 वाजता घडली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, देवराव (नाव बदललेले आहे) हा 27 वर्षीय तरुण 17 जून  रोजी बाहेरहून अचानक घरी आला. त्यावेळी त्याची पत्नी घरात प्रियकरासोबत गप्पा मारत होती. देवरावला हा प्रकार लक्षात आला. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. दरम्यान, आता आपले बिंग फुटणार, अशी भीती पत्नीला वाटली. त्यामुळे तिने चाकू घेऊन पतीवर हल्ला केला. यात देवरावचे  डोके फुटले. त्यावर प्रियकराने देवरावला धक्‍का दिला. तो खाली पडताच दोघे दुचाकीवरून पळून गेले, असा गुन्हा दाखल आहे.

परंतु, अधिक तपास करताना पोलिस नाईक खिल्लारे यांना घटना अशी घडलीच नसल्याचे समोर आले. देवराव हा दारूच्या नशेत असतो. त्याने नशेतच फिर्याद दिली असावी, असे त्याच्या बहिणीनेच पोलिसांना सांगितले. वाद झाला, पण त्यावर त्याची पत्नी ही नणंदेच्या घरी गेली होती. प्रियकरासोबत नाही, असे तपासात समोर आले, असे पोलिसांनी सांगितले.