Wed, Jul 24, 2019 15:15होमपेज › Aurangabad ›  अंधारीत दिवसभर कडकडीत बंद

 अंधारीत दिवसभर कडकडीत बंद

Published On: Aug 09 2018 5:37PM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMअंधारी (जि. औरंगाबाद): प्रतिनिधी 

सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. नेहमी गजबजणाऱ्या अंधारी बाजारतळावर हॉटेल, पानटपरी, चहाची दुकाने, टेलरिंग व्यवसाय दिवसभर बंद असल्याने संपूर्ण गावात शुकशुकाट होता.  

सकाळी आठ वाजता अंधारीसह परिसरातील मुख्य रहदारीसाठी असलेल्या आळंद अंधारी नाचवेल रस्त्यावरील भवानी माता मंदिराजवळील चौकात जवळपास पाचशेच्यावर तरुणांनी तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन करीत फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.