Sun, Apr 21, 2019 02:20होमपेज › Aurangabad › उत्तरपत्रिका बोर्डातच; निकाल लांबणार

उत्तरपत्रिका बोर्डातच; निकाल लांबणार

Published On: Mar 16 2018 1:24AM | Last Updated: Mar 16 2018 1:04AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

याही वर्षी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षक, प्राध्यापकांनी टाकलेला बहिष्कार कायम असल्याने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे मंडळाच्या  कार्यालयात तसेच पडून आहेत. परिणामी यंदाही निकाल लांबण्याची शक्यता शैक्षणिक  वर्तुळात वर्तविली जात आहे. 

बारावीच्या परीक्षा सुरू होऊन जवळपास 20 दिवस उलटले आहेत. मात्र प्राध्यापकांनी या उत्तरपत्रिका तपासणीसाठी नेलेल्या नाहीत. शहरातील शाळा किंवा विनाअनुदानित तत्त्वावरील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी शासन दरबारी मुंबई, पुणे, नागपूर येथे अनेक आंदालेने करूनही शासन अनुदान याद्या जाहीर करून त्याची तरतूद करत नाही व शंभर टक्के अनुदान देत नाही म्हणून यावर्षीही  पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे, असे विविध विनाअनुदानित संघटनांकडून सांगण्यात आले आहे. त्या संदर्भात संघटनांनी बोर्डात सचिवांकडे निवेदनही दिली होती. 

अनुदानितच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता, मात्र कालंतराने तो मागे घेण्यात आला. विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार अजूनही कायम असल्याने त्यांची मनधरणी करावी लागत आहे. निकाल वेळेत लावण्यासाठी बोर्ड प्रयत्न करेल. 
- सुगता पुन्ने, सचिव, माध्य.व उच्च माध्य. शिक्षण मंडळ