Thu, Nov 22, 2018 01:27होमपेज › Aurangabad › धारूरात पाच दिवस चालतो होळीच जल्लोष

धारूरात पाच दिवस चालतो होळीच जल्लोष

Published On: Mar 02 2018 1:22AM | Last Updated: Mar 01 2018 10:56PMधारूर : सतीश वाकुडे

धारूर  ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणून बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या रंगोत्सवाला सातशे वर्षांची परंपरा आहे.  यामध्ये रोज चाचर काढून वीर पुरुषांवर फाग गाऊन म्हणजे गीते गाऊन शहरातील कटघरपुरा ते पेठ विभागातील बालाजी मंदिरात आरती करून ढोलकी व झांझ वाजवत रंग खेळत ही चाचर काढली जाते. पाच दिवस सायंकाळी  पंचाच्या घरी थंडाई, भाग, रंगाचा कार्यक्रम करण्यात येतो. यामध्ये शहरातील नागरिक सहभागी होतात. 

धारूर येथे होळीचा सण अगळा-वेगळा सण साजरी करण्यात  प्रसिद्ध आहे.  होळी सण नव्याची पौर्णिमेला एरंडीच्या झाडाची होळीच्या जागेवर लावून ‘राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की’ असा जय घोष करून सुरुवात होते. होळी दिवशी होळी पेटवून रंगाला खर्‍या अर्थाने सुरुवात होते. हा सण सतत पाच दिवस साजरा केला जातो. पाटील गल्लीतील होळीच्या ठिकाणी त्याच्या वरील रचलेली फाग ‘एक धर्मवीर बलिदान हुँआ, पापासिंगने नाम किया, एक धर्मवीर बलीदान हुँआ’ अशा फाग वीर पुरुषांच्यावर गाऊन कटघरपुरा ते पेठ विभागातील बालाजी मंदिर येथे महाआरती करून ठरलेल्या पाच मानकरी  दुबे,  तिवारी, डॉ. स्वरुपसिंह हजारी, मिश्रा, सद्दीवाल यांच्या निवासस्थानी रंगाचा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमात भांग, थंडाई व रंग केला जातो. यामध्ये शहरातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात या ही वर्षी मोठ्या उत्साहात पाच ही दिवस हा सण ऐतिहासिक परंपरेनुसार साजरा करण्यात येणार आहे.