Sun, Apr 21, 2019 01:57होमपेज › Aurangabad › बार र् महिना म् आई छरे होळी। 

बार र् महिना म् आई छरे होळी। 

Published On: Mar 02 2018 1:22AM | Last Updated: Mar 01 2018 10:52PMपरळी : रवींद्र जोशी

बंजारा समाजातील पारंपारिक पद्धतीने होळीचा सण परळी तालुक्यातील विविध तांड्यावर अतिशय उत्साहाने  साजरा करण्यात आला. बंजारा संस्कृतीचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बंजारा बांधव जल्लोषात व  पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. 

 होळी या सणाला बंजारा समाजात फार महत्व आहे. बंजारा समाज राहत असलेल्या तांड्यावर पंधरा दिवस दररोज सायंकाळी लेंगी (गाणे) गायीली जाते. महिला व पुरुषांच्या लेंगीने सर्वच तांड्यावर उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालेले आहे. बंजारा समाज मागील काही वर्षात शहरात मोठ्या संख्येनी स्थायिक झाला आहे. तरीही  शहरातील बंजारा समाजात पारंपरिक सणाची गोडी कायम आहे. यासाठी विविध तांड्यावर  होळी सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

बंजारा समाजातील परंपरे नुसार होळी पेटविण्यात आली. बंजारा बोली भाषेतील बंजारा समाजाचे आकर्षण असलेल्या लेंगी (गाणे) चा कार्यक्रम अतिशय रंगतदार ठरला. लेंगीच्या कार्यक्रमात महिला व पुरुष गायक सहभागी झाले होते. 

बंजारा परंपरेची होळी साजरी होत असताना नागरिकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषा व  ताल आणि सुरांच्या वेगळ्या शैलीने होळी गीतांची एक रंगत अनुभवायला मिळाली. होळी भोवती फेर धरून गायली जाणारी बंजारा गीते व थिरकणारी पाउले यामुळे ही होळी लक्षवेधी ठरली.